top of page
  • Writer's pictureSachin Waykar

१०० कौरव आणि ५ पांडव : कृष्णकमळ एक अद्भुत फूल

कृष्ण कमळ असे म्हंटल्यावर समोर येते नीलवर्णीय सुंदर सुवासिक फुल. महाभारतात कृष्णाचे वर्णन निळ्या शरीराचा असे केले गेले आहे. त्यामुळेच की काय या फुलाला कृष्ण कमळ हे नाव पडले असेल. ह्या फुलाचे नाव घेताच महाभारतातील कौरव पांडव आठवतात. खरं सांगायचं झालं तर भारतीय संस्कृतीत या फुलाला अतिशय महत्व आहे. या फुलाच्या शंभर पाकळ्या म्हणजे १०० कौरव आणि पाच पुंकेसर म्हणजे पाच पांडव आणि मध्यभागी द्रौपदि आणि ब्रह्मा, विष्णू महेश अशी सुंदर रचना असते.  



हिंदूंनी जसा या फूलाचा संबंध त्यांच्या देवाशी लावला तसाच ख्रिश्चनांनी ही या Passion Flower वर केलेल्या कथा आहेत.येशू ख्रिस्ताला सूळावर चढवले त्या वेळाचा अनुभव (Passion for suffering) कथन करण्यासाठी आणि तो अधिक श्रवणिय करण्यासाठी या फूलाच्या रचनेचा उल्लेख केला जातो. चला तर या लेखात आपण कृष्ण कमळ या फुला विषयी माहिती घेऊयात.

इंग्रजी मध्ये पॅशन फ्लॉवरअसे म्हटलेल्या या फुलाचे शास्त्रीय नाव Passiflora incarnata असे असून या प्रकारच्या २४ प्रजाती आहेत ज्या दक्षिण अमेरिकेत आढळतात. त्यापैकी ५ ते ६ प्रजाती भारतात आढळतात. कृष्ण कमळ ही वेल वर्गीय वनस्पती असून ती आधाराच्या साहाय्याने वाढते. सुमारे ८ ते १२ मीटर इतकी  उंच असू शकते. माझ्या बाल्कनीमधील कृष्ण कमळाची वेल ६ फूट इतकी वाढली आहे. या फुलांच्या लाल, जांभळा, निळा आणि नारंगी या रंगांच्या प्रजाती उपलब्ध आहेत.  कसे लावाल?  कुंडीला ५ ते ६ छिद्रे पाडून घ्या. पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी पहिले त्या कुंडीमध्ये खडीचा एक थर पसरा. नंतर शेणखत, वाळू निंबोळी पेंड यांचे मिश्रण बनवून घ्या. थोडा थर मग पसरा. नंतर  रोपवाटिकेतून आणलेल्या रोपाची प्लॅस्टिक पिशवी काढून मातीसकट ते रोप कुंडीमध्ये ठेवा. नंतर वाळू, माती, शेणखत आणि निंबोळी पेंड यांच्या मिश्रणाने कुंडी भरून घ्या.  कुंडीच्या तळाशी भरपूर खडे टाका जेणेकरून पाण्याचा निचरा होईल आणि मुळे सडणार नाहीत.  रोपांची लागवड  दाब कलम किंवा माध्यम आकाराची काडी जमिनीत लावल्यास नवीन रोप तयार करता येईल. ४० ते ४५ दिवसात नवीन रोप तयार होईल. 



सूर्यप्रकाश कृष्ण कमळ फुलण्यासाठी भरपूर सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. या वेलीला फुले येण्यासाठी कमीतकमी ४ तासांच्या सूर्यप्रकाशाची गरज असते. त्याशिवाय फुले येणार नाहीत. जेवढे जास्त ऊन असेल तेवढे हे झाड निरोगी राहते आणि भरपूर फुले येतात.  पाणी  वेल जर भरपूर उन्हात असेल तर पाण्याची नियमित आवश्यकता असते. कृष्ण कमळाला ओलावा टिकवून ठेवणारी पण पाण्याचा योग्य निचरा होणारी माती आवश्यक असते. पाणी कमी झाले तर वेल  सुकू लागतो आणि जास्त झाले तर पाने गळू लागतात. परिणामतः: झाडांची मुळे सडू लागतात आणि झाड दगावते.  खते  सुंदर व सुवासिक वेल असल्यामुळे खतांचे  योग्य प्रकारे  व्यवस्थापन गरजेचे आहे. भरपूर फुले येण्यासाठी बोनमील, रानमिल, शेणखत, आणि कंपोस्ट टाकल्यास छान फुले येतात. तुम्ही एनपीके आणि डीएपी देखील वापरू शकता. बहरासाठी अंड्याच्या सालीचा चुरा किंवा कांद्याच्या  सालीचे पाणी देखील वापरू शकता.  किडीचा प्रादुर्भाव  माझ्या अनुभवाप्रमाणे कृष्ण कमळाच्या वेलीस खूप कमी प्रमाणात किडीचा   प्रादुर्भाव होतो. अफीड्स, व्हाईट फ्लाय, स्पायडर माईट, इत्यादी काही रोग या झाडास होतात. कडुनिंबाचे तेल आणि साबणाचे पाणी यांचे मिश्रण करून फवारणी केल्यास रोगांचा नायनाट होतो.  फुलांचा कालावधी / हंगाम   या वेलीस साधारणपणे जून ते जानेवारी या हंगामामध्ये फुले येतात. 





औषधी उपयोग

या वेलीची मुळे सोडल्यास बाकी सर्व भाग औषधी उपयोगात आणले जातात. निद्रानाश, चिंता, एडीएचडी, फायब्रोमायाल्जीया अशा अनेक आजारात तोंडावाटे हे फुल खाल्ले जाते. मूळव्याध, सूज, भाजल्या मुले झालेल्या जखमा तसेच सूज यांच्या साठी फुलाचा थेट त्वचेवर प्रयोग केला जातो. अमेरिकेत १९७८ पर्यंत याचा वापर झोप येण्यासाठी तसेच चिंता दूर करण्यासाठी केला जात असे. अन्न पदार्थ आणि पेये यांच्या मध्ये फुलाचा वापर सुगंध म्हणून केला जातो.


काही महत्वाच्या टिप्स 

  1. वेल वर्गीय वनस्पती असल्याने भरपूर सूर्य प्रकाश गरजेचा असतो

  2. वेल खूप उंच जात असल्याने वेळोवेळी छाटणी करणे गरजेचे आहे 

  3. महिन्यातून एकदा केळीच्या किंवा कांद्याच्या सालीचे पाणी द्यावे जेणेकरून फुले जास्त येतील 

  4. कडुनिंबाचे तेल आणि साबण पाणी यांचा कीटक नाशक म्हणून  वेळोवेळी वापर करावा 






वरील गोष्टी अमलात आणल्यास सुंदर आणि भरपूर फुले देणारी कृष्ण कमळाची वेल तुमच्या बागेत बहरेल आणि सूर्यपक्षी, फुलपाखरे, मधमाशी  इत्यादी पाहुणे त्यांच्या भोवती बागडू लागतील. चला तर मग कृष्ण कमळ लावून आपली बाग सुशोभित करू    

1,241 views5 comments

Recent Posts

See All
Post: Blog2_Post
bottom of page